नगरसेवकांचीही आता बायोमेट्रिक हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

पालिका कर्मचाऱयांप्रमाणे आता नगरसेवकांचीही बायोमेट्रिक हजेरी लावण्यात येणार आहे. मंगळवारी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले असून पुढील महिन्यापासून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे. यामुळे पालिकेच्या महासभेसाठी येऊन हजेरी लावून पळणाऱया नगरसेवकांना चाप बसणार आहे. शिवाय गैरहजर राहणाऱया नगरसेवकांचे मानधनही कापले जाणार आहे.

पालिका कर्मचाऱयांना शिस्त लावण्यासाठी जुलै 2017 पासून हजेरीपट बंद करून बायोमेट्रिक हजेरी पद्धत सुरू करण्यात आली आहे. याच धर्तीवर नगरसेककांचीही बायोमेट्रिक हजेरी घ्यावी अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती. याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला होता. जनतेने आपले प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेत निवडून पाठवलेले नगरसेवक महासभेत उपस्थितीतच राहत नसतील तर जनतेच्या मागण्या पूर्ण कशा होणार असा मुद्दा नगरसेवकांनी यावेळी उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी गटनेत्यांच्या बैठकीत एकमत झाले असून असा प्रस्ताव आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आल्याचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

…म्हणूनच घेतला निर्णय
पालिकेच्या सभागृहात नागरी किकासकामांसह मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. अनेक किकासकामांना मंजुरी दिली जाते, धोरणात्मक निर्णयही घेण्यात येतात. अशा वेळी नगरसेककांची हजेरी अत्यंत महत्वाची असते. पक्षांना यावेळी एखाद्या निर्णयाच्या मंजुरीसाठी नगरसेवकांच्या संख्याबळाची गरज असते, मात्र नगरसेवक गैरहजर राहिल्यामुळे पक्षाचीही अडचण होते. त्यामुळेच असा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.