
मुंबईत विविध भागांत कावळे आणि कबुतरांच्या मृत्युदरात मोठय़ा प्रमाणात घट झाली असून शनिवारी दिवसभरात 49 पक्ष्यांचा मृत्यू झाला. मुंबईत दरदिवशी मरणाऱया पक्ष्यांची संख्या 200च्या पुढे गेली होती. मात्र आता ही संख्या 50 च्या खाली आली आहे. मुंबईत 10 जानेवारीपासून आतापर्यंत 2,799 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.
बर्ड फ्लूच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि मुंबई महापालिका सतर्क झाले असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. मात्र मुंबईला बर्ड फ्लूचा धोका नसला तरी गेले काही दिवस कावळे आणि कबुतरांचा मृत्यू होत असून शुक्रवार सकाळी 7 ते शनिवार सकाळी 7 वाजेपर्यंत 49 पक्ष्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाने दिली.

























































