बीकेसी कनेक्टरवरून 473 बस सुरू केल्याने माहुलवासीय नाराज

295

बीकेसी कनेक्टरवरून बेस्ट बस क्र. 473 ला प्रवेश दिल्याने चेंबूर व वांद्रे येथील प्रवाशांची सोय झाली असली तरी माहुलवासीयांचा सायन येथे जाण्याचा थेट मार्ग बंद झाल्यामुळे तेथील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. माहुल येथे एमएमआरडीएने मुंबईतल्या विस्थापित लोकांसाठी 72 इमारती उभारल्या असून तेथे शाळा, कॉलेज, रुग्णालय, दवाखाना आदी सुविधा नसल्यामुळे त्यांना सायन, दादर यासारख्या ठिकाणी वारंवार जावे लागते.

बेस्टने वांद्रे बस स्थानक आणि माहुलगावदरम्यानचा बसमार्ग क्र.473 शुक्रवारपासून कलानगर ते एव्हरार्ड नगरदरम्यान धारावी, राणी लक्ष्मीबाई चौक, शीवमार्गे जाणारा मार्ग शुक्रवारपासून चुनाभट्टी बीकेसी उन्नत मार्गाने नेल्याने माहुलशी सायन येथे होणारा थेट संपर्कही तुटला आहे. त्यामुळे माहुल येथील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हा बसमार्ग रुळलेला असल्याने सायन, धारावी, पिवळा बंगला, टी जंक्शन येथे जाण्यासाठी कोणताही मार्ग ठेवला नाही अशी तक्रार प्रवासी करीत आहेत. या मार्गावर नवीन बस सुरू न करता जुना बसमार्ग वळवल्याने माहुलचे प्रवासी नाराज झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या