
पर्यावरण संवर्धनासाठी 2027 पर्यंत ‘बेस्ट’मध्ये 100 टक्के इलेक्ट्रिक बस आणल्या जाणार आहेत. शिवाय लवकरच 200 डबल डेकर आणि 1900 बस इलेक्ट्रिक प्रकारच्या आणल्या जाणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वुमन फॉर क्लायमेट, सिटीज फॉर फॉरेस्टस् कॅम्पेन, ई-बस मिशन अशा तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर पालिका मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात स्वाक्षऱया करण्यात आल्या, यावेळी ते बोलत होते.
वातावरण बदलाचा फटका जगाला बसत असून त्यामुळे काही देशांच्या पर्यावरणासह अर्थव्यवस्थाही रसातळाला गेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वातावरण बदलाशी जुळवून घेत निकोप पर्यावरणासाठी मुंबईने पुढाकार घेतला आहे. बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत, पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई वातावरण कृती आराखडा बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात वुमन फॉर क्लायमेट, सिटीज फॉर फॉरेस्टस कॅम्पेन आणि ई-बस मिशन उपक्रमाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या. मुंबईकरांच्या वाहतूक सुविधेसाठी बसेसची संख्या दहा हजारांवर नेली जाणार आहे. या सर्व गाडय़ा इलेक्ट्रिक प्रकारच्या असतील असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ‘बेस्ट’च्या ताफ्यात सद्यस्थितीत सुमारे 3242 बसेस आहेत. तर सुमारे एक हजार बस भाडेतत्त्वावर धावतात. या कार्यक्रमप्रसंगी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, खासदार अरविंद सावंत, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, विरोधी पक्षनेते रवी राजा, स्थापत्य समिती अध्यक्ष स्वप्नील टेंबवलकर, नगरसेवक अमेय घोले, नगरसेविका राखी जाधव, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, अश्विनी भिडे, पी. वेलरासू, संजीवकुमार, बेस्ट महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आदी मान्यवर उपस्थित होते.
माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी!
कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून वेगाने लसीकरण सुरू असून इतर सोसायटय़ांना प्रोत्साहित करण्यासाठी ज्या सोसायटय़ांचे लसीकरण 100 टक्के झाले आहे अशा सोसायटय़ांच्या दर्शनी भागांत ‘माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी’ असे मराठी आणि इंग्रजीत भित्तिपत्रक लावले जाणार आहे. या भित्तिपत्रकाचे (लोगोचे) प्रकाशन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी पालिका मुख्यालयात झाले. ढाल असलेले भित्तिपत्रक आपल्या सोसायटीवर लागणे, ही निश्चितच अभिमानास्पद बाब असून इतर सोसायटय़ांनीदेखील लवकरच 100 टक्के लसीकरणाचे ध्येय गाठावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, खासदार अरविंद सावंत, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, सभागृह नेत्या विशाखा राऊत, अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, सुरेश काकाणी आदी उपस्थित होते.
कुमन फॉर क्लायमेट
वुमन फॉर क्लायमेट या उपक्रमासाठी 25 महिलांची निवड केली जाणार आहे. मुंबई महानगरात पर्यावरण संरक्षण व संवर्धन उपक्रमांमध्ये पुढाकार घेण्यासाठी, निरनिराळे उपाय सुचवून त्यांची प्रत्यक्ष व्यापक अंमलबजावणी होण्यासाठी महिलांचे नेतृत्व विकसित करण्यात येणार आहे.
सिटीज् फॉर फॉरेस्टस्
सिटीज् फॉर फॉरेस्टस् या वनसंरक्षण, वृक्षारोपण, वन व्यवस्थापनाशी निगडित करारावर जगभरातील 57 शहरांनी 22 सप्टेंबर 2021 रोजी स्वाक्षरी केली आहे. त्यात मुंबईचाही समावेश झाला आहे. या उपक्रमाला मुंबईमध्ये चालना देण्यासाठी आणि मुंबईकरांचा सहभाग वाढवण्यासाठी रेडिओ मिर्ची एंटरटेनमेंट नेटवर्कद्वारे जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.
शेतकऱयांच्या मदतीबाबत लककरच निर्णय
अतिवृष्टीच्या अस्मानी संकटात अडकलेल्या शेतकऱयांना आर्थिक मदत देण्याबाबत राज्य सरकारकडून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच शेतकऱयांना योग्य ती मदत करण्यात येईल, असे आदित्य ठाकरे यांनी केले. शेतकऱयांच्या प्रलंबित विमा परताव्याबाबत योग्य निर्णय घेऊन शेतकऱयांना मदत मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन काम करण्याची वेळ आली आहे. अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना वेगाने राबवली पाहिजे. ग्रीन एनर्जी वाढवली पाहिजे. राजकीय पक्षांनी आता पर्यावरणासाठी एकत्र यायला हवे! – आदित्य ठाकरे, पर्याकरण मंत्री

























































