मुंबईची कोरोना मृत्यूची आकडेवारी पारदर्शक; अमेरिकेच्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केले शिक्कामोर्तब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण, त्यातून बरे झालेले रुग्ण, सध्या सक्रीय असलेले रुग्ण आणि कोरोना मृत्यूंची आकडेवारी ही अत्यंत पारदर्शक असून त्यात कोणत्याही प्रकारची लपवाछपवी करण्यात आलेली नाही, असे अमेरिकेचे आघाडीचे वर्तमानपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे.

कोरोना रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार अहोरात्र घेत असलेल्या मेहनतीची दखल या आधी धारावीच्या रूपाने जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. जगातील तीन दाटीवाटीच्या परिसरांचा उल्लेख करत त्यापैकी धारावीतील कोरोनाचा संसर्ग आता नियंत्रणात असल्याचा हवाला जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. त्यानंतर आता अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टने हिंदुस्थानातील कोरोना मृत्यूंच्या आकडेवारीबाबत लपवाछपवी होत असल्याबद्दलचा विशेष अहवाल प्रसिद्ध केला आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या देशांतील महानगरांच्या प्रमुखांकडून कोरोना मृत्यूची आकडेवारी मागवण्यात आली होती. मात्र, मुंबई महानगरपालिकेने सगळी अद्ययावत माहिती दिली. त्यात लपवाछपवी केली नाही. कोलकाता महानगरपालिकेने तर माहितीच दिली नाही, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

पालिका आयुक्तांची भारी कामगिरी

वॉशिंग्टन पोस्टने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या कामगिरीची दखल घेतली आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाच चहल यांनी मुंबई आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. सुरुवातीला कोरोना मृत्यूचे निश्चित आकडे समजत नव्हते. त्याची तात्काळ दखल घेत पालिका आणि खासगी रुग्णालयांना मृत्यूचे आकडे ४८ तासांच्या आत पालिका वॉर रूमला कळवणे बंधनकारक केले तर खासगी कोरोना लॅबवरही रिपोर्ट उशिरा पाठवल्यामुळे कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे एवूâण कोरोना रुण आणि मृत्यूंचा निश्चित आकडा समजणे शक्य झाले.