
थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेने धडक कारवाईची मोहीम सुरू केली असून शुक्रवारी दोन कंपन्यांच्या गाडय़ा जप्त करताच 1 कोटी 28 लाखांचा भरणा केला. पालिकेच्या ‘आर-उत्तर’ विभागाकडून ‘मे. एनआरओ एन रोज’ कंपनीवर आणि ‘के-पश्चिम’ विभागाकडून ‘मे लष्करीया प्रॉपर्टीज’ या कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली.
मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्काचा स्रोत आहे. आर्थिक वर्षात 5 हजार 500 कोटींची कसुली होणे अपेक्षित होते, मात्र फेब्रुवारी अखेरपर्यंत केवळ 3 हजार 154 कोटी एवढीच मालमत्ता कराची कसुली झाली आहे. त्यामुळे मालमत्ता कराची कसुली वाढवण्यासाठी पहिल्यांदाच ‘बृहन्मुंबई महापालिका अधिनियम 1888’ च्या कलम 205 व 206 चा वापर करून चल संपत्तीच्या जप्तीची (चारचाकी, दुचाकी, टीव्ही, प्रिज, एसी आदी) कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारईमध्ये दागिने, जडजवाहिर मात्र जप्त केले जात नाहीत. यानुसार आज दहिसर परिसरातील ‘मे. एनआरओ एन रोज’ या कंपनीकडे असलेल्या 1 कोटी 6 लाखांच्या मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी ‘किआ’ कंपनीचे उच्च श्रेणीतील चारचाकी वाहन जप्त केले. तर ‘के पश्चिम’ विभाग कार्यक्षेत्रातील अंधेरी पश्चिम परिसरात असणाऱया ‘मे. लष्करीया प्रॉपर्टीज’ यांच्या उच्च श्रेणीतील दोन वाहनांना ‘जामर’ बसवून ती स्थानबद्ध करण्यात आली. या कारवाईनंतर खडबडून जाग्या झालेल्या दोन्ही कंपन्यांनी अनुक्रमे 78 लाख क 50 लाख असा एकूण रुपये 1 कोटी 28 लाखांचा भरणा महापालिकेकडे केला. तसेच संबंधित कंपन्यांनी मालमत्ता कराची उर्करित रक्कम लककरात लककर भरण्याची हमी दिली. त्यानंतर सदर वाहने सोडण्यात आली आहेत, अशी माहिती महापालिकेच्या कर निर्धारक व संकलक खात्याद्वारे देण्यात आली आहे.
































































