मध्य रेल्वेवर आज रात्री चार तास ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे विद्याविहारजवळील जुना पादचारी पूल तोडण्यासाठी शनिवार, 7 मार्चच्या रात्री 11.15 ते पहाटे 3.15 दरम्यान ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते कल्याण, खोपोली मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे. ठाणे, कल्याण, अंबरनाथ लोकल फेरी रद्द करतानाच काही लोकल केवळ कुर्ल्यापर्यंत धावतील. याशिवाय सीएसएमटीच्या दिशेने येणाऱया काही लोकल रद्द होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे रात्री प्रचंड हाल होणार आहेत.