मुंबईतील चर्नीरोड भागात इमारतीला आग

749

मुंबईतील चर्नीरोड मधील एका रहिवासी इमारतीला आग लागली आहे. ड्रीमलँड चित्रपटगृहाजवळ ही इमारत असून तळमजल्यावर ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावर आग लागून ही आग संपूर्ण इमारतीत पसरली. या आगीत आठ ते दहा जण अडकल्याचं सुरुवातीला सांगण्यात येत होतं. अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी क्रेन आणि शिडीच्या मदतीने सुखरूप इमारतीच्या बाहेर काढले आहे. मात्र अद्यापही एक व्यक्ती तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावर अडकली असल्याची माहिती अग्नीशमन दलाकडून देण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे जवान या इसमाचा शोध घेत आहे.

दरम्यान, आग लागल्याचे नेमके कारण अद्यापही कळू शकलेले नाही आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या