चेंबूरमध्ये 9 कावळ्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

लातूर आणि परभणीत मोठया प्रमाणात कोंबडय़ांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज चेंबूरच्या टाटा कॉलनी परिसरात 9 कावळय़ांचा मृत्यू झाल्यामुळे मुंबई महानगरपालिका सावध झाली आहे. त्यात घाबरून जाण्याचे काही नाही. इतर राज्यांप्रमाणे एकाच वेळी मोठया प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. चेंबूरमध्ये मृत्यू झालेल्या 9 कावळय़ांच्या मृतदेहाचे नमुने राज्याच्या पशु संवर्धन विभागाने गोळा केले असून हे सर्व नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पुढील तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर कावळय़ांच्या मृत्यूचे कारण समोर येईल, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली.