
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच अत्यवस्थ रुग्णांची संख्याही झपाटय़ाने वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत मुंबईतील अत्यवस्थ रुग्णांची संख्या 1109 वर पोहोचली असून 12 हजार 799 बाधितांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. विशेष म्हणजे एका आठवडय़ात अत्यवस्थ रुग्णांची संख्या 489 ने वाढली आहे.
मुंबईत रुग्णसंख्या वाढत असताना अत्यकस्थ रुग्णांची संख्याही वाढू लागल्याने पालिकेचे आक्हान वाढले आहे. दररोज आढळणाऱया पॉझिटिक्ह रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसल्याचे सांगितले जात असली तरी अशा लक्षणे नसलेल्या रुग्णांमुळेच कोरोनाच्या प्रसाराचा धोका वाढत असल्याचे तज्ञ सांगत आहेत. यातच रुग्णांची संख्या वाढल्याने अत्यवस्थ रुग्णांची संख्याही वाढली आहे. 7 एप्रिलच्या आकडेवारीनुसार मुंबईतील एकूण 77 हजार 495 सक्रिय रुग्णांपैकी 63 हजार 587 रुग्णांमध्ये बाधित असूनही कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तर 12799 मध्ये कोरोनाची लक्षणे आहेत.
आठवडय़ात 31 हजार सक्रिय रुग्ण वाढले
- सक्रिय रुग्णांची संख्या 1 एप्रिल रोजी 55005 होती. ही संख्या वाढत जाऊन 8 एप्रिल रोजी 86 हजार 279 वर पोहोचली आहे. म्हणजेच एकाच आठवडय़ात सक्रिय रुग्णांची संख्या 31 हजार 274 इतकी वाढली आहे.
- रुग्ण दुपटीच्या कालावधीतही झपाटय़ाने घट होत असून एका आठवडय़ात दुपटीचा कालावधी 49 दिवसांवरून 33 दिवसांवर आला आहे. म्हणजेच आठवडय़ाभरात रुग्ण दुपटीचा कालावधी 16 दिवसांनी घटला आहे.





























































