
कोरोनाविरोधातील लढाईत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे महत्वाचे आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचधर्तीवर मुंबईतील विविध भागांत सध्या लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत असून या लसीकरण केंद्राचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. यामुळे मुंबईतील लसीकरण मोहिमेला अधिक बळ मिळेल हे मात्र निश्चित.
शिवसेना प्रभाग क्र.28 चे नगरसेवक एकनाथ हुंडारे यांच्या अथक प्रयत्नाने लसीकरण केंद्राचे लोकार्पण उप महापौर सुहास वाडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, सहाय्यक आयुक्त संजय कुऱहाडे, महिला विभाग संघटक मनाली चौकीदार, विधानसभा संघटक संतोष धनावडे, उपविभाग समन्वयक अजित मोगल आदी उपस्थित होते.
शिवसेना खासदार अरविंद सावंत व विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या प्रयत्नाने नुकताच मरीन ड्राइव्ह येथील जैन महिला मंडळ येथे कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, जैन महिला मंडळ अध्यक्ष सुशीलाबेन दलाल, विभाग संघटक जयश्री बाळ्ळीकर आदी उपस्थित होते.



























































