भरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती

951

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्व 227 प्रभागात भरारी पथकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आज ही माहिती दिली.

मुंबईत आता संपर्कात आल्याने कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळेल तो भाग सील करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक परिसर पोलिसांमार्फत सील आहेत. आता कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करिता 24 प्रभागांत भरारी पथक नेमण्यात आले आहेत. या पथकांकडे एक वाहन तसेच पालिका अधिकारी- कर्मचारी, पोलीस तसेच महसूल विभागाचा कर्मचारी व वैद्यकीय सहायकचा समावेश असणार आहे. हे पथक कोरोनाविषयक रुग्ण, त्यांच्या संपर्कात आलेले लोक यांची माहिती प्रत्यक्ष जाऊन घेतील. तसेच ताप, सर्दी, न्युमोनिया सदृश्य आजार असलेले लोक देखील शोधतील व त्यांच्या तपासणीसाठी तातडीने पुढील कार्यवाही केली जाईल, असे आयुक्त परदेशी यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी टाळावी असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या