मुंबईत आतापर्यंत 1 लाख कोरोनामुक्त; केवळ 19 हजार 64 सक्रिय रुग्ण

224

मुंबईत बुधवारी 923 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत कोरोनाचे 1 लाख 70 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर आता केवळ 19 हजार 64 सक्रीय रुग्ण विविध रुग्णालये आणि कोरोना केंद्रांमध्ये उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 79 टक्क्यांवर आले असून रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळेच कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.

बुधवारी 1,132 नवे रुग्ण

मुंबईत बुधवारी कोरोनाचे 1,132 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 50 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 923 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत 50 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 940 झाली आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 6 लाख 22 हजार 961 चाचण्या झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या