दुबईत अडकलेली शेकडो मराठी कुटुंबे सुखरूप मायदेशात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुबईत अडकलेली शेकडो मराठी कुटुंबे ‘मसाला किंग’ डॉ. धनंजय दातार यांच्या मदतीमुळे सुखरूप मायदेशात परतली आहेत. आज महिला व लहान मुलांचा समावेश असलेला आणखी एक 136 जणांचा ग्रूपही हिंदुस्थानात परतला.

कोविड-19 प्रभाव आणि लॉकडाऊन काळात हजारो हिंदुस्थानी संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) अडकून पडले. दुबईहून हिंदुस्थानात विविध ठिकाणी विमान वाहतूक सुरळीत झाल्यानंतरही यातील अनेकांना आर्थिक अडचणींमुळे मायदेशी परतणे अवघड झाले होते. यामध्ये नोकरी गमावल्याने अडचणीत आलेले, विद्यार्थी, गरोदर महिला व लहान मुले यांचा समावेश होता. यामध्ये बेरोजगार झालेल्या अनेकांना घराचे भाडे परवडत नसल्याने सार्वजनिक बागांमध्ये राहण्याची वेळ आली होती. रोजच्या जेवणाचा प्रश्न होता. याची गंभीर दखल घेत ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांनी सामाजिक दृष्टिकोन ठेवून देशवासीयांना परत मायदेशात सुखरूप आणण्याचा विडा उचलला आणि आतापर्यंत शेकडो कुटुंबांना परतही आणले. यामध्ये मोफत तिकिटांपासून व होम क्वारंटाईनबाबतही मार्गदर्शन करणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी अल अदील कंपनीच्या वतीने संचालक वंदना दातार, हृषिकेश दातार व रोहित दातार, प्रवासी प्रतिनिधी म्हणून पुण्याच्या सामाजिक कार्यकत्र्या धनश्री पाटील, अकबर ट्रॅव्हल्सचे सुलेमान इक्रम यांची मोलाची मदत होत आहे. दरम्यान, एकट्या महाराष्ट्रातील 65,000 हून अधिक लोक आजही दुबईत अडकून पडले असून मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत.