मुंबईत 1,308 नवे रुग्ण, 39 जणांचा मृत्यू

430

मुंबईत एका दिवसात कोरोनाचे 1308 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 39 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1,497 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकुण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 63 हजार 431 वर पोहोचली आहे.

मुंबईतील गेल्या 48 तासांत 39 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 241 झाली आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 22 हजार 779 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची लागण होण्याचा डबलिंग रेट वाढून आता 50 दिवसांवर आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या