एमसीए निवडणूक आज, सहसचिव, खजिनदार पदासाठी चुरस

353

बीसीसीआयकडून दणका देण्यात आल्यानंतर गेली अनेक महिने रेंगाळलेली मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) निवडणूक उद्या रंगणार आहे. हिंदुस्थानी क्रिकेटमधील प्रतिष्ठsची निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱया एमसीएच्या या निवडणुकीत यंदा मोठी चुरस दिसून येत नाही. अध्यक्षपदी विजय पाटील यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर गुरुवारी अमोल काळे यांची उपाध्यक्षपदी आणि संजय नाईक यांची सचिवपदी बिनविरोध निवड होईल हेही पक्के झाले आहे. दोन्ही पदांसाठी प्रतिस्पर्ध्यांकडून उमेदवार उभे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आता सहसचिव व खजिनदार या दोन पदांसह व्यवस्थापकीय समितीच्या नऊ पदांसाठी रस्सीखेच लागणार आहे. व्यवस्थापकीय समितीच्या नऊ जागांसाठी 27 उमेदवार रिंगणार उतरले आहेत.

महत्त्वाच्या पदांवर बाळ महाडदळकर गटाचे वर्चस्व

यंदाच्या एमसीएच्या निवडणुकीत महत्त्वाच्या पदांसाठी बाळ महाडदळकर गटाचे वर्चस्व राहणार हे निश्चित झाले आहे. विजय पाटील, अमोल काळे व संजय नाईक यांची आपआपल्या पदांसाठी निवड झाल्यात जमा आहे. फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. त्यानंतर उरलेल्या दोन पदांसाठी या गटातून सहसचिवपदी शाहआलम शेख व खजिनदारपदी जगदीश आचरेकर हे उभे आहेत. त्यांच्यासमोर सहसचिवपदी संगम लाड व खजिनदारपदी मयांक खांडवाला असणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या