
नशेसाठी घरफोह्डय़ा करणाऱया दुकलीला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. संकेत ऊर्फ चमेली संतोष चव्हाण आणि चंदू ऊर्फ चंदू रमेश पवार अशी त्या दोघांची नावे असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.
तक्रारदार या बोरिवली पूर्वच्या शिव छाया चाळीत राहतात. गेल्या आठवडय़ात रात्री त्या घरी झोपल्या असता संकेत आणि चंदू हे दोघे त्याच्या घराच्या ग्रीलमधून आत शिरले. त्यांनी उशीखाली ठेवलेली कपाटाची चावी चोरून कपाटातील 2 लाखांचे दागिने आणि 45 हजार रुपये चोरून त्या दोघांनी पळ काढला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी संकेत आणि चंदूला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

























































