फटका मारून फोन चोरणारा अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

दहिसर-मीरा रोड स्थानकांदरम्यान महिला प्रवाशाचा मोबाईल चोरून पळणाऱयाला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. कन्हैया सातडिया असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार महिला या मंगळवारी दहिसर-ते मीरा रोड असा प्रवास करत होत्या. लोकलच्या दरवाजाजवळ उभ्या राहून त्या फोनवर बोलत होत्या. लोकल सुरू होताच एकाने त्यांच्या हातावर फटका मारला. फटका मारून मोबाईल चोरून पळ काढला. घडल्या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक भास्कर पवार यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक इरफान नदाफ आणि स्टाफने तपास सुरू केला. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावरून पोलिसांनी कन्हैयाला दहिसर परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त केला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. कन्हैयाच्या दुसऱया साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

दोन तासांत केली अटक

अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱया महिलेला मारहाण करून तिचा मोबाईल चोरणाऱयाला अवघ्या दोन तासांत अटक केली. बुधवारी ही घटना राम मंदिर परिसरात घडली. मोबाईल चोरून पळून गेलेल्या समाधान शेंडगेला अवघ्या दोन तासात बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली.