चोरीच्या संशयावरून तरुणाची हत्या

429
crime-spot

चोरीच्या संशयावरून 35 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना ग्रँट रोड परिसरात घडली. हत्येप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद करून सनी खारवाला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तीन दिवसांपूर्वी ग्रँट रोड स्थानकाजवळील पादचारी पुलावर एकजण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. काही वेळात डी. बी. मार्ग पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी त्याला उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. मृताची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले.

आपली प्रतिक्रिया द्या