मायलेकाच्या आत्महत्येप्रकरणी पायलटला अटक

मायलेकाच्या आत्महत्येप्रकरणी साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल करून पायलटला अटक केली आहे. शादाब खान असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रेश्मा ही साकीनाक्याच्या नाहर अमृत शक्ती येथील तुलिपिया अपार्टमेंटमध्ये मुलासोबत राहत होती. पतीच्या निधनानंतर रेश्मा ही प्रचंड नैराश्यात होती. त्यात शेजारील रहिवाशांकडून होणाऱया त्रासाला ती पंटाळली होती. काही दिवसांपूर्वी रेश्माने फेसबुकवर एक पोस्ट अपलोड केली होती. सोमवारी रात्री रेश्मा आणि तिचा मुलगा गरुड या दोघांनी इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती समजताच साकीनाका पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी रेश्मा आणि गरुडला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्या दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. रेश्मा आणि तिच्या मुलाच्या आत्महत्येप्रकरणी साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन शादाबला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले.

आपली प्रतिक्रिया द्या