सीएस, एलएलबीच्या विद्यार्थ्यांची ‘कोंडी’एकाच दिवशी परीक्षा आल्याने भवितव्य टांगणीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

लेखापाल (कंपनी सेक्रेटरीज) आणि एलएलबीचे विद्यार्थी परीक्षा कोंडीत सापडले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱया एलएलबी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 28 मे ते 3 जून या कालावधीत होणार आहेत, तर द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात येणारी कंपनी सेक्रेटरीची परीक्षा 1 ते 10 जून या कालावधीत पार पडणार आहे. या दोन्ही परीक्षांना बसणाऱया विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या टांगणीला लागले असून कोणता अभ्यास करायचा, कोणती परीक्षा द्यायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.

मुंबई विद्यापीठाने टीवायबीए, एमएच्या विविध अभ्यासक्रमाबरोबरच एलएलबी तीन वर्षे आणि पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. प्रथम वर्ष एलएलबी (तीन वर्षे) अभ्यासक्रमाची परीक्षा 28 मेपासून सुरू होणार आहे. त्यानंतर एलएलबीच्या अन्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा आहेत. मुंबई विद्यापीठातील शेकडो विद्यार्थी लॉच्या परीक्षेसोबतच सीएसची परीक्षादेखील देतात. दोन्ही परीक्षा एकाच वेळी आल्याने त्यांना कोणत्याही एका परीक्षेला मुकावे लागणार आहे, असे स्टुडंट लॉ कौन्सिलचे ऍड. सचिन पवार यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाकडे वेळापत्रक बदलण्याची मागणी
यंदा एलएलबीच्या परीक्षा घेण्यास विलंब झाला असून या परीक्षा मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात घेण्याची मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलने केली आहे. मे अखेरीस परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी तर बोंबललीच आहे त्यातच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये एलएलबीच्या विद्यार्थ्यांची सनदची परीक्षा होणार आहे. मे अखेरीस होणाऱया परीक्षेचा निकाल वेळेत लागला तरच या विद्यार्थ्यांना सनदची परीक्षा देऊन प्रॅक्टिस करता येणार आहे. लॉची परीक्षा जूनमध्ये संपली तर निकाल जाहीर व्हायला किती वेळ लागेल हे सांगता येणे कठीण असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

स्टुडंट लॉ कौन्सिलच्या वतीने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे लॉ परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. लॉची परीक्षा लवकर घेऊन वेळेत निकाल लावण्यात यावा जेणेकरून प्रॅक्टिससाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळेल.

विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजातील शेकडो महिला आणि पुरुषांनी सोमवारी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी या समाजातील महिलांनी पारंपरिक वेशात नृत्य सादर करून सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.