
मुंबईचे मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखले जाणारे मुंबईतील डबेवाले कोरोनाच्या काळात नव्या उपक्रमाचा श्रीगणेशा करणार आहेत. प्रथम फक्त डब्यांची डिलव्हरी करणारे मुंबईतील डबेवाले आता जेवणासहित चाकरमान्यांपर्यंत डबे पोहचविणार आहे. मुंबईतील डबेवाल्यांनी टिफीन सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई डबेवाले असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळकेर यांनी दिली.
राज्य सरकारने लॉकडाऊन ओपन केल्यानंतर अनेक ठिकाणी सरकारी आणि खासगी कार्यालये सुरु करण्यात आली आहेत. या कार्यालयातील चाकरमान्यांसाठी जेवणाच्या डब्यांची व्यवस्था करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरु लागली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील डबेवाल्यांनी आपलीच टिफीन सेवा सुरु केली आहे. ज्या ग्राहकांना या टिफीन सेवेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी 9702765636 या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन डबेवाल्यांनी केले आहे.




























































