
सामना ऑनलाईन । मुंबई
शनिवारी मुंबईत पावसाला दमदार सुरूवात झाली. मुंबई, मुंबई उपनगर, कोकण आणि राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे दक्षिण मुंबईतील दादर, हिंदमाता, किंग्ज सर्कलसह, सायन, चुनाभट्टी आणि सायन परिसरात पावसाचा जोर जास्त होता. पावसातही चाकरमान्यांची भूक भागवण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या मुंबईतील डबेवाल्यांनी आपली सेवा सुरूच ठेवली.
अडचणींवर मात करत डबेवाल्यांनी मुंबईकरांची भूक भागवण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीत कोणतीही असो मात्र आपल्या सेवेत खंड पडू न देणाऱ्या डबेवाल्यांनी मुसळधार पावसात कशाचीही पर्वा न करता कामावर गेलेल्या चाकरमान्यांना डबे पोहोचवले.
दरम्यान, मुंबईत सकाळी ८ वाजेपासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुलुंड, कुर्ला, घाटकोपर या उपनगरांमध्ये ७५.६६ मिमी पावसाची नोंद झाली. तर पश्चिम उपनगरांमध्ये २७ मिमी इतका पाऊस पडला.

























































