मराठमोळ्या अक्षयने दादरला सुरु केला बिर्याणी स्टॉल!

लॉकडाऊनमुळे जगभरात अनेक कंपन्या बंद पडल्या, लाखो लोक बेरोजगार झाले. त्यापैकीच एक म्हणजे शेफ अक्षय पारकर. फाईव्ह स्टार, सेव्हन स्टार हॉटेलात आणि इंटरनॅशनल क्रुझवर शेफ म्हणून कामाचा अनुभव असणाऱ्या अक्षयलादेखील लॉकडाऊनचा फटका बसला. त्याने नोकरी गमावली. परंतु परिस्थितीपुढे हार न मानता संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्याने दादरमध्ये स्वतःचा छोटासा बिर्याणी स्टॉल सुरू केला आहे. सध्या अक्षयच्या या स्टॉलचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असून मुंबईकरांनी त्याच्या जिद्दीला सलाम केला आहे.

अक्षयने ताज सॅट्स या सेव्हन स्टार हॉटेलात तसेच सात वर्षे इंटरनॅशनल क्रुझवर शेफ म्हणून काम केले आहे. लॉकडाऊनमध्ये त्याने नोकरी गमावली. परंतु शांत बसून काही होणार नाही हे त्याने ओळखले होते. आपली जेवण बनवण्याची कला त्याने कामी आणली आणि दादरच्या शिवाजी मंदिरसमोर ’पारकर्स बिर्याणी हाऊस’ नावाचा स्टॉल सुरू केला. त्याच्या या स्टॉलवर सध्या व्हेज, नॉनव्हेज बिर्याणी मिळत असून या कामात त्याला कुटुंबीयांची साथ मिळत आहे. अल्पावधीत चविष्ट बिर्याणीमुळे त्याने अनेक ग्राहक जोडले आहेत.

डिप्रेशनमध्ये जाऊ नका!

हॉटेलातील नोकरीच्या तुलनेत अक्षयला सध्या मिळणारे उत्पन्न कमी असले तरी आज ना उद्या हे चित्र नक्कीच बदलेल, असे तो सांगतो. परिस्थितीपुढे हार मानून डिप्रेशनमध्ये जाऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा. आलेल्या संकटांचा मुकाबला करा, असा लाखमोलाचा सल।ा त्याने तरुणांना दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या