
मुंबईहून डेहराडूनला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला पक्षाने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. लँडिंगच्या काही मिनिटे आधीच ही धडक झाली. पक्ष्याच्या धडकेमुळे विमानाचा पुढचा भाग खराब झाला. लँडिंगनंतर विमानातील सर्व 186 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यानंतर विमान पुढील तपासणी आणि दुरुस्तीसाठी बे एरियात नेण्यात आले. या घटनेत कोणताही प्रवासी किंवा क्रू मेंबर जखमी झाला नाही.
इंडिगोचे IGO 5032 हे विमान रविवारी सायंकाळी मुंबईहून डेहराडूनला नियमित वेळेनुसार रवाना झाले. डेहराडूनच्या जॉली ग्रँट विमानतळावर नियोजित वेळेनुसार लँडिंगच्या तयारीत असतानाच काही मिनिटे आधी विमानाच्या पुढील भागावर पक्षी धडकला. यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

























































