महेंद्रसिंह धोनीचे वाढते वय लक्षात घेता त्याच्या आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत, मात्र तरीही तो आगामी वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो. कारण बांगलादेश क्रिकेट बोर्डाने एशिया इलेव्हन संघासाठी महेंद्रसिंह धोनीसह सात हिंदुस्थानी क्रिकेटपटूंची ‘बीसीसीआय’कडे मागणी केली आहे. पण महेंद्रसिंह धोनी पुढल्या वर्षी होणाऱया आयपीएलनंतर खेळेल की नाही याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.

अशा परिस्थितीत ‘टीम इंडिया’चे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल सूचक विधान केले आहे. ‘तो आयपीएलदरम्यान कसा खेळ करतोय यावर सर्व काही अवलंबून असणार आहे. सध्याच्या यष्टिरक्षकांची कामगिरी आणि धोनीची कामगिरी या गोष्टी तपासून घ्याव्या लागतील. आयपीएल ही मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतरच तुमचा विश्वचषकासाठीचा 15 जणांचा संघ कमी-अधिक प्रमाणात पक्का होईल,’ अशी माहितीही रवी शास्त्राr यांनी दिली. याचा अर्थ आयपीएलनंतर धोनी निवृत्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या