
राज्यातील वीज बिल थकीत असलेल्या तब्बल 42 लाख कृषी कंपधारक शेतकऱयांना महावितरणने मोठा दिलासा दिला आहे. सध्या शेतकऱयांकडे वीज बिलापोटी तब्बल 45 हजार कोटी रुपये थकीत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या कृषी कंप वीज जोडणी धोरणांतर्गत पृषी कंपधारकांची सप्टेंबर 2020 पर्यंतची थकबाकी गोठवण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱयांना सदरची रक्कम पुढील तीन वर्षात टप्प्याटप्प्याने भरता येणार आहे. तसेच या थकबाकीसाठी कृषी कंपाचे वीज कनेक्शन कापू नये, असे निर्देश महावितरणने आपल्या विभागीय कार्यालयांना दिले आहेत.
महावितरणचे राज्यात अडीच कोटी वीज ग्राहक असून त्यामध्ये 42 लाखांच्या घरात कृषी कंपधारक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे जवळपास 26 हजार कोटी रुपये वीज बिलाची मूळ थकबाकी आहे. तर दंड आणि व्याजाची रक्कम 18 हजार कोटीहून अधिक आहे. तसेच महावितरणच्या घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यक ग्राहकांकडे हजारो कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी महावितरणने वीज बिल थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये शेतकऱयांचीही वीज कापली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची दखल घेत महावितरणने सप्टेंबर 2020 पूर्वीच्या थकीत वीज बिलासाठी कनेक्शन कापू नये असे निर्देश दिले आहे. त्याचबरोबर वीज बिलाबाबत शेतकऱयांची तक्रार असेल तर तत्काळ त्याची चौकशी करून दुरुस्त करावे, असेही बजावले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱया शेतकऱयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
चालूचे बिल न भरणाऱया शेतकऱयांना नोटीस देऊनच वीज कापा
महावितरणने शेतकऱयांना थकीत वीज बिल भरण्यासाठी तीन वर्षांपर्यंत सवलत दिली आहे. मात्र ग्राहकांनी सप्टेंबर 2020 नंतरच्या वीज वापराचे बिल नियमित भरावे, असे स्पष्ट केले आहे. तरीही शेतकऱयांनी सदरचे वीज बिल भरले नसेल तर त्याचा वीजपुरवठा खंडित करण्याआधी नोटीस द्यावी. त्यानंतरही वीज बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करावा, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.


























































