मच्छीमारांचे 9 मार्चपासून धरणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली 9 मार्च ते 11 मार्चदरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत मच्छीमार नगर, कफ परेड येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने सन 1981 मासेमारी कायद्याअंतर्गत सुधारित अध्यादेश 23-11-2021 रोजी केला असला तरी आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याकरिता अंमलबजावणी कक्ष निर्माण करावा, प्रकाशझोताद्वारे (एलईडी) आकर्षित केलेले मासेमारी करणाऱया नौकांचे व्ही.आर.सी. आणि मासेमारी परवाना रद्द करून नौका जप्ती करण्याची कायद्यात सुधारणा करावी, डिझेलवरील थकीत परतावा मिळावा, मच्छीमारांचे एनसीडीसी इतर थकीत कर्जावरील व्याज आणि मुद्दल कर्ज माफ करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 500 कोटीची तरतूद करावी, पालघर जिह्यात उभारण्यात येणारे प्रस्तावित वाढवण व्यापारी बंदर रद्द करावे, मुंबईत कोळी भवन उभारावे आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष लिओ कोलासो आणि कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी दिली.