
सामना प्रतिनिधी। मुंबई
राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. डॉ. निधी पांडे यांची शिवशाही पुनर्विकास प्रकल्प मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. व्ही. एन. कळम यांची विकास आयुक्त (असंघटित कामगार) मुंबई या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त आर. व्ही. निंबाळकर यांची पुणे झोपडपट्टी पुनर्विकासाच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सी.के.डांगे यांची मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती झाली आहे. सुशील खोडवेकर यांची शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालयाच्या उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
























































