मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा गेला खड्डय़ात

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांची केलेली डागडुजी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात वाहून गेली आहे. त्यामुळे हा महामार्ग पुन्हा खड्डय़ात गेल्याने कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे मेगा हाल सुरू झाले आहेत. महामार्गावर खड्डय़ांची चाळण झाल्यामुळे वाहनांचा वेग मंदावला असून चाकरमान्यांना ठिकठिकाणी वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.

कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यात आले होते. मात्र गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सुरू झालेला पाऊस अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे महामार्गावर खड्डय़ांमध्ये भरलेले खडी आणि डांबर वाहून गेले आहेत. त्यामुळे या खड्डय़ांचा आकार पूर्वीपेक्षा मोठा झाला आहे. पनवेल, चिकणी, सुकेळी, कडखळ, रातकड, काकण, नागोठणे, कोलाड, सुकेळी, पेण, कडखळ, रामवाडी, इंदापूर या भागांमध्ये महामार्गावर खड्डय़ांची अक्षरशः चाळण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या