फिल्मसिटीच्या बचावासाठी ‘कट अँड कव्हर’ बोगदा

294

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या कामात फिल्मसिटीला धक्का लागू नये यासाठी 1200 मीटरचा ‘कट ऍण्ड कव्हर’ बोगदा काढण्यात येणार आहे. चित्रीकरणाच्या कामात अडथळे येऊ नयेत आणि ध्वनिप्रदूषण टाळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत प्रचंड वाढलेल्या वाहतूककोंडीतून सुटका होणासाठी पालिकेचा महत्त्वाकांक्षी ‘गोरेगाव-मुलुंड लिंक रोड’ प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून मुख्य बोगद्याकडे जाणारा रस्ता गोरेगावच्या चित्रनगरीमधून जाणार आहे. मात्र यामुळे चित्रनगरीचे विभाजन होण्याचा धोका आहे. शिवाय वाहनांच्या वर्दळीमुळे चित्रीकरणामध्ये अडथळे निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे फिल्मसिटीच्या खालून ‘कट ऍण्ड कव्हर बॉक्स’ बोगदा तयार करण्यात येणार आहे.

  • गोरेगाव चित्रनगरीमधून मुख्य बोगद्याकडे जाणाऱया 1700 मीटर लांबीच्या रस्त्यापैकी सुमारे 1200 मीटर लांबीच्या ‘3 बाय 3’ मार्गिकेसह कट ऍण्ड कव्हर बॉक्स बांधण्यात येणार आहे.
  • बोगद्यात आपत्कालीन व्यवस्थेसाठी 300 मीटर अंतरावर दोन्ही बोगदे जोडले जाणार आहेत.

असा होणार मार्ग

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा एकूण 12.2 किमी आहे. यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 4.7 किमीचा बोगदा काढण्यात येणार आहे, तर फिल्मसिटीतून 1.6 किमीचा ‘कट ऍण्ड कव्हर’चा बोगदा काढण्यात येणार आहे.

वन्य जीव मंडळाची परवानगी मिळाली

या लिंक रोड प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्य जीव मंडळाकडून वन्य जीव संरक्षण कायद्यांतर्गत परवानगी मिळाली असून वन कायद्यांतर्गत परवानगी मिळणे बाकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या