Grant Road Fire: ग्रॅण्ट रोड परिसरात लाकडाच्या गोदामाला भीषण आग,एकाचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या ग्रॅण्टरोड येथील कामाठिपुर परिसरात गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच 16 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचून आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत होते. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील ग्रॅण्ट रोड परिसरात लाकडाच्या गोदामाला आज मध्यरात्री तीनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.लाकडाचे गोदाम असल्याने आगीने वेगाने पेट घेतला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. दरम्यान ही आग लागल्यानंतर स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती कळवली. अग्निशमन दल, रुग्णवाहिका, कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले.या घटनेची माहिती मिळताच 16 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.आग विझविण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले.या आगीत लाकडाचे गोदाम जळून खाक झाले आहे. तर एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना पहाटे दोनच्या सुमारास घडली. आग इमारतीच्या दोन मजल्यांपर्यंत मर्यादित होती. आगीमुळे जवळचा एक मॉल आणि एक उंच इमारती रिकामी करण्यात आल्या.