हार्बरच्या पाच रेल्वे स्थानकांत आरपीएफची ‘सॅटेलाइट’ निगराणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माटुंगा रोड रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणारा रोडरोमियो पकडल्यानंतर मध्य रेल्वे सावधान झाली असून रात्रीच्या निर्मनुष्य होणाऱया हार्बर मार्गावरील पाच स्थानकांत इंटरनेट प्रोटोकॉल असलेली व्हिडीओ सर्व्हेलन्स यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे, असे मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त अशरफ के. के. यांनी सांगितले. वडाळा येथे 41, कॉटनग्रीन 37, सॅण्डहर्स्टमध्ये 40, डॉकयार्डमध्ये 27 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या कॅमेऱयांची पाहणी करण्यासाठी डिफेन्स रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डीआरडीओची टीम केंद्रातून येणार असून त्यानंतर हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. आयपी ऍड्रेस कॅमेऱयांमुळे आरपीएफला नियंत्रण कक्षातून लाइव्ह मॉनिटरिंग करता येणार आहे. तसेच मोबाईलवरून सॅटेलाइटच्या मदतीने स्थानकांतील हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येणार आहे. मस्जिद बंदर स्थानकाचे नियंत्रण सीसीएसएमटीतील नियंत्रण कक्षातून तर उर्वरित स्थानकांचा नियंत्रण कक्ष वडाळा आरपीएफमध्ये असणार आहे.