मुंबईतील घरांच्या किमती घसरल्या, जागतिक 150 निवासी शहरांच्या यादीत 146 व्या स्थानावर, नाईट फ्रँकचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

जगातील 150 शहरांतील निवासी घरांच्या किंमतीत वर्ष 2021 मध्ये 10.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. नाईट फ्रँकच्या ग्लोबल रेसिडेंशियल सिटीज इंडेक्सच्या अहवालात हा दावा केला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने 146 वा क्रमांक पटकावला आहे. मुंबईतील घरांच्या किमतीत 1.8 टक्क्यांची घट झाली असून हैद्राबाद, चेन्नई, कोलकत्ता आणि अहमदाबाद या शहरांनीही घरांच्या किमतीत मुंबईला मागे टाकले आहे.

हैद्राबादमधील घरांच्या किमतीत 2.5 टक्क्यांची वाढ झाली असून जागतिक क्रमवारीत हैद्राबादने 128 वे स्थान पटकावले आहे. देशांतर्गत स्तरावर चेन्नईने दुसरे स्थान मिळविले असून घरांच्या किंमती वाढीसह चेन्नई जागतिक स्तरावर 131 व्या क्रमांकावर आहे, तर कोलकाता 135व्या आणि अहमदाबाद 139व्या क्रमांकावर आहे. तसेच बंगळुरू 140व्या आणि दिल्ली 142व्या क्रमांकावर आहे. हिंदुस्थानने घरांच्या विक्रीचे मूल्य निश्चित केले त्याचबरोबर बचतीत वाढ केल्याने बाजारात स्थिरता आली, असे नाइटफ्रँक इंडियाचे अध्यक्ष शिशिर बैजल यांनी सांगितले.