गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडवणार डिम्ड कन्व्हेयन्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहकारी गृहनिर्माण संस्था आणि मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेत निर्माण होणार्या समस्या सोडवण्यासाठी ‘डिम्ड कन्व्हेयन्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन’ने पुढाकार घेतला आहे. या सेवाभावी संस्थेची नुकतीच नोंदणी करण्यात आली आहे. डिम्ड कन्व्हेयन्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ही संस्था राज्य सरकार, राज्य सहकार आयुक्त, सहकारी संस्था निबंधक, सहकार विभागातील अधिकारी, कायदेशीर सल्लागार आणि संस्था यांच्यात समन्वयाचे काम करणार आहे. तसेच अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांना मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेत प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करून अर्ज निकाली लावण्यास मदत होणार आहे. या संस्थेच्या कार्यकारिणीत अध्यक्ष डॉ. अजित मांजरेकर, सचिव ऍड. निलेश परमार, खजिनदार ऍड. देवांग शहा तर सदस्य सीए सुधीर लोहिया, सीए योगेश रावल, ऍड. दिनेश मळेकर, ऍड. अवधूत सावंत, ऍड. सिद्धेश रसाळ, ऍड. निलेश चौहान आणि ऍड. अमर शेलार कामकाज पाहत आहेत.