ऑर्गेनिक रंग कसे ओळखाल ?

सामना ऑनलाईन । मुंबई

सगळीकडे होळीची धूम सुरू आहे. होळी अधिक रंगीबेरंगी व्हावी यासाठी बाजारात विविध रंगही विक्रीस आले आहेत. त्यातही हल्ली साधारण रंगांपेक्षा नैर्सिगक (ऑर्गेनिक ) रंगांना अधिक मागणी असल्याने हे रंग विकत घेण्यासाठी तरुणांची गर्दी होत आहे. पण हे रंग असली आहेत की नकली ते ओळखणं महत्वाचं आहे.

organic

साध्या रंगाच्या तुलनेत ऑर्गेनिक रंग महाग असतात. 100 रुपयांपासून 200 रुपये किलो याप्रमाणे हे रंग बाजारात मिळतात.

तर सिंथेटीक (कृत्रिम) रंग ऑर्गेनिक रंगाच्या तुलनेत स्वस्त असतात. त्यांची किंमत 30 ते 50 रुपये असते.

synthetic

तसेच, सिंथेटीक रंग हातात घेतल्यावर खरखरीत लागतात. तसेच ते त्वचेला चिकटतात.त्यांना चमक नसते.

तर ऑर्गेनिक रंग फार काळ टिकत नाहीत. पाण्याने हात धुतला की निघून जातात.

काहीजण फुलांपासूनही रंग तयार करतात.

आपली प्रतिक्रिया द्या