अरुणकुमार जगदीश यांची मुंबई इंडियन्सच्या सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षक पदी नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाच वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या 2023 च्या हंगामापूर्वी अरुण कुमार जगदीश यांची सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता अरुणकुमार मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होणार आहेत. मार्क बाउचर हे मुंबईचे मुख्य प्रशिक्षक आहेत तर किरॉन पोलार्ड फलंदाजी प्रशिक्षक आहेत. शेन बाँड आणि जेम्स पेमेंट हे अनुक्रमे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत.

अरुणकुमार हे हिंदुस्थानी संघाचे सलामीवीर राहिले आहेत. त्यांनी 100 हून अधिक प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7,208 धावा केल्या आहेत. 1993 ते 2008 या काळात त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले. निवृत्तीनंतर ते कोचिंगकडे वळले आणि त्यात ये यशस्वी झाले. 2013-14 आणि 2014-15 मध्ये रणजी करंडक, इराणी चषक आणि विजय हजारे करंडक विजेतेपद पटकावले तेव्हा अरुण कुमार कर्नाटक संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते.