
महाराष्ट्राला देशातील एक आघाडीचे राज्य करण्यासाठी ‘जय महा भारत पार्टी’ने आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्वच्या सर्व 288 मतदारसंघांत ही पार्टी आपले उमेदवार उभे करणार असून निवडणुकीसाठीचा जाहीरनामाही पार्टीने शुक्रवारी जाहीर केला.
देशातील सर्वसामान्य नागरिकांना सबल करण्याचा निश्चय ‘जय महा भारत पार्टी’ने केला आहे. सामान्य नागरिकांचे हित डोळ्यांसमोर ठेवूनच राज्यात होणाऱया आगामी निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आल्याची माहिती पार्टीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अनंतविष्णू देव प्रभू यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी महासचिव बळीराम ठाकूर, संयुक्त सचिव गोरक आदी उपस्थितीत होते.































































