किंग्ज सर्कलजवळ पुलाचा हाइट बॅरियर कोसळल्याने वाहतूककोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किंग्ज सर्कल स्थानकाजवळ पादचारी पुलाच्या लोखंडी हाइट बॅरियरवर शुक्रवारी भरधाव ट्रक धडकल्याने तो कोसळला. सकाळी 6 वाजता ही घटना घडली. जास्त वर्दळ नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याने दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मात्र कोसळलेला हाइट बॅरियर हटवण्यासाठी खूप वेळ लागल्याने प्रवासी मात्र लटकले. ट्रकचालकावर माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

किंग्ज सर्कल रेल्के स्थानकाजवळून जाणाऱया अवजड वाहनांना अटकाव करण्यासाठी हा हाइट बॅरियर लावण्यात आला होता. सकाळी येथून जाणाऱया ट्रकच्या धडकेने हा बॅरियर कोसळला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तत्काळ रस्त्याचा ताबा घेऊन हाइट बॅरियर हटवण्याचे काम सुरू केले. हा हाइट बॅरियर तासाभरात काढून हटवला. या अपघातानंतर शीव सर्कलच्या दिशेने व ठाणे-पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे आधीच वाहतूककोंडीतून प्रवास करणाऱया प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळे शीव ते दादर हे 15 मिनिटांचे अंतर कापण्यासाठी 60 ते 70 मिनिटे लागत होती.

जोगेश्वरीत स्लॅब कोसळून तिघे जखमी

जोगेश्वरी पूर्व येथील नटकर नगर त्रिमूर्ती बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या सीलिंगचे स्लॅब कोसळून केळस्कर कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा असे तिघे जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. जखमींना नजीकच्या कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यातील मुलगा-वडील यांची प्रकृती स्थिर असून आईची गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. या दुर्घटनेतील जखमींची नावे विनय केळस्कर (25), सुहास केळस्कर (52), सुजिता केळस्कर (43) अशी आहेत.