मुंबईत दरड कोसळून 20 जणांचा मृत्यू, आदित्य ठाकरेंकडून पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत मुसळधार पावसामुळे विक्रोळी आणि चेंबुरमध्ये दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांबद्दल दुख व्यक्त करून मदत जाहीर केली आहे. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आपण संकटग्रस्तांच्या दुःखात सहभागी असून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने चेंबुरमध्ये दरड कोसळली, त्यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. विक्रोळीतील सुर्य नगरमध्ये दरड कोसळल्याने आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे.


या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांने दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.