
मध्य रेल्वे आपल्या विविध अभियांत्रिकी कामाबरोबरच देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.40 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सर्व गाडय़ा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सर्व गाडय़ा विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. दरम्यान हार्बर मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक असणार नाही.