
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक खोलवर गेल्याने त्याची दिशा पश्चिम-वायव्य अशी राहील. त्यामुळे येत्या चार दिवसांत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी ही माहिती दिली. मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ तसेच कोकणात हा पाऊस होईल असे त्यांनी सांगितले. कोकणासह आतल्या पट्टय़ात 17 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सक्रीय राहील, असे भुते यांनी सांगितले.
पीकांच्या नुकसानीची शक्यता
कापणीला आलेल्या पीकांचे या पावसामुळे कदाचित नुकसान होऊ शकते असा इशारा हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे.
– राज्यात सलग दुसऱया दिवशी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने अनेक जिल्ह्यात शेतीच्या कामाला ब्रेक लावलाय. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाताली काही जिह्यात आज मुसळधार पाऊस बरसला.

























































