महाराष्ट्र राज्य योगासन स्पर्धा

 

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने ऑनलाइन राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 15, 20 व 28 वर्षांखालील मुले व 14, 19 व 27 वर्षांखालील मुलींना सहभागी होता येणार आहे. यादरम्यान 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत ऑनलाइन उपांत्यपूर्व स्पर्धा रंगेल. या फेरीचा निकाल 3 ते 5 मार्चदरम्यान घोषित केला जाईल. यानंतर प्रत्येक गटातील 20 खेळाडूंची उपांत्य तसेच फायनल फेरीसाठी निवड केली जाईल. याचदरम्यान राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी महेश कुंभार (9664696687) व प्राजक्ता खवळे (9029361355) यांच्याशी संपर्क साधावा.

आपली प्रतिक्रिया द्या