‘पोक्सो’तल्या गुन्ह्यातील आरोपीला पाच वर्षे कैदेची शिक्षा

55

सामना प्रतिनिधी। मुंबई

अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱया तरुणाला दिंडोशी कोर्टाने दणका दिला आहे. विनयभंग करून पुन्हा त्या मुलीला धमकावणाऱया  तरुणाला कोर्टाने सबळ पुराव्याच्या आधारे पाच वर्षे कैद व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कैदेची शिक्षा ठोठावली आहे.

बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱया दोन अल्पवयीन मुली 12 मे 2017 रोजी रात्री त्यांच्या वडिलांना बोलवायला जात असताना अंधाराचा फायदा घेत एका तरुणाने मुलीचा विनयभंग केला होता. त्यानंतर त्याने मुलीला धमकावलेदेखील होते. याप्रकरणी बांगूर नगर पोलीस ठाण्यात विनयभंग व ‘पोक्सो’अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संदीपकुमार कश्यप (28) याला अटक केली होती. त्यानंतर तपासी अधिकारी उपनिरीक्षक प्रवीण सुरवाडे, रवींद्र आंबेडकर तसेच अंमलदार के. व्ही. दळवी यांनी दिंडोशी कोर्टात संदीपकुमारविरोधात सबळ पुरावे सादर केले. त्याआधारे दिंडोशी विशेष सत्र न्यायालयाच्या महिला न्यायाधीश देव यांनी पाच वर्षे कैद व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

 

आपली प्रतिक्रिया द्या