मुंबई मराठी साहित्य संघाचे पुरस्कार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. अ.ना. भालेराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने रंगभूमीवर कार्यरत रंगकर्मींना सन्मानित करण्यात येते. या वर्षी हे पुरस्कार लीना भागवत, मंगेश कदम, सुधाकर भानुशे, नंदलाल रेळे, तनय पिंगळे, तन्वी गोरे, सिद्धी बोंद्रे, अतुल पेठे यांना जाहीर झाले आहेत. चित्रतपस्वी राजदत्त आणि संघाच्या अध्यक्षा अचला जोशी यांच्या उपस्थितीत 25 ऑगस्टला संध्याकाळी 5.30 वाजता डॉ. भालेराव सभागृहात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच रजनी जोशी, अरविंद पिंपळगावकर, सुभाष भागवत आणि सुधीर ठाकूर यांचाही सन्मान करण्यात येणार असल्याचे नाटय़शाखेचे कार्यवाह प्रमोद पवार यांनी सांगितले.