सेल्फ डिफेन्स ऍण्ड मार्शल आर्टस्चे घवघवीत यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवली भारतीय खेळ प्राधिकरण येथे रविवारी संपन्न झालेल्या ‘थांगता जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये’ प्रतीक्षानगरमधील सेल्फ डिफेन्स मार्शल आर्टस् अकादमीच्या विद्यार्थ्यांनी पदक कमवून घवघवीत यश मिळविले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थाप्रमुख सेंसाय शंतनु जाधव यांचे लाभले व शिक्षण समिती अध्यक्ष/नगरसेवक मंगेश सातमकर नगरसेवक रामदास कांबळे यांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी प्रोत्साहित केले. त्याचबरोबर शाखाप्रमुख संजय म्हात्रे यांनीही विद्यार्थ्यांना सहाय्य केले.

  • सुवर्णपदक विजेते : सुमित जाधव, पूजा पवार, सोहेल सय्यद, ज्योती कांबळे, विघ्नेश शिंदे
  • रौप्यपदक विजेते  : साहिल सय्यद
  • कांस्यपदक विजेते : दीपाली बाबर, वंदिता वैद्य, ओम शाहू, सुमुख पटवर्धन,अमन कांबळे, संजना शेवाळे, काजल रापोलू, सिद्धू उप्पारी.