
सामना प्रतिनिधी। मुंबई
मुंबई-पुणे महामार्गावर ओव्हर हेड गॅन्ट्री (फलक) बसवण्याचे काम करण्यात येणार असल्यामुळे उद्या, मंगळवार दुपारी 12 ते 2 या वेळेत महामार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील कुसगाव टोलनाका येथून जुना मुंबई-पुणे महामार्गाने पुण्याकडे वळवण्यात येणार आहे.
दरम्यान, या कालावधी पुण्याकडे जाणारी वाहतूक अवजड आणि मालवाहतूक खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्याच्या आधी थांबवण्यात येतील.



























































