मेट्रो-3च्या भुयारीकरणाचे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार

539

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून भुयारीकरणाचे काम सोमवारपर्यंत 76 टक्के पूर्ण झाले असून येत्या सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के भुयारीकरण पूर्ण होईल असा विश्वास मुंबई मेट्रो रेल महामंडळाने (एमएमआरसीएल) व्यक्त केला आहे. या मार्गावरील विधान भवन मेट्रो स्थानकाच्या 5218 चौरस मीटरच्या स्लॅबचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे अशी माहितीही एमएमआरसीएलने दिली आहे.

एमएमआरसीएलने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर ही माहिती दिली आहे. मेट्रो-3 च्या 26 प्रस्तावित स्थानकांपैकी 13 स्थानकांचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. भुयारीकरणासाठी मुंबईच्या भूगर्भात उतरवण्यात आलेल्या 17 टनेल बोअरिंग मशीनने अलीकडेच आपला 25 वा ब्रेक-थ्रू यशस्वीरीत्या पार केला. अशी एकूण 32 भुयारे केली जाणार आहेत.

गेल्या डिसेंबरपर्यंत मेट्रो-3 च्या भुयारीकरणाचे काम 40 किलोमीटर इतके झाले होते. मेट्रो-3 प्रकल्प हा 30 हजार कोटी रुपये खर्चाचा आहे. देशातील ही पहिली भुयारी मेट्रो आहे. या मेट्रो मार्गामुळे दक्षिण मुंबई ही थेट उत्तर मुंबईला जोडली जाणार आहे. त्यामुळे लोकल रेल्वेमधील गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या