भुयारी मेट्रोच्या खोदकामाने माहीम येथे म्हाडा इमारतीला तडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुलाबा -बीकेसी -सिप्झ भुयारी मेट्रो तीनच्या कामामुळे हादरे बसून माहीम येथील म्हाडाच्या एका जुन्या इमारतीला तडा गेल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली असून या घटनेत कोणतीही हानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

माहिम पश्चिम येथील पॅराडाईज सिनेमाजवलील कॅफे मिराज समोरील म्हाडाच्या लक्ष्मी बाग बिल्डिंगला तडे गेल्याचे तक्रार रविवारी सायंकाळी हेल्पलाइनवर आल्याने अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे अधिकारी सावंत यांनी या इमारती पाहणी केली. यावेळी पोलीस आणि म्हाडाचे वॉर्ड अधिकारीही उपस्थित. मेट्रोच्या बांधकामाने हादरे बसून या इमारतीला तडे गेल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. मेट्रोचे सिव्हील इंजिनिअर मनोज राऊत आणि इतर अभियंत्यांनी इमारतीची तपासणी सुरू केली. या घटनेत कोणतीही हानी झाली नसून रात्री उशिरापर्यंत इमारतीची पाहणी सुरू होती. जर इमारतीला धोका उत्पन्न झाला असेल तर रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.