तलावांत डिसेंबरपर्यंतचा पाणीसाठा फुल्ल!

528

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांत एकूण 460343 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. सद्यस्थितीत तलाव 32 टक्केच भरले असले तरी हे पाणी पुढील 121 दिवसांना म्हणजेच डिसेंबरपर्यंत पुरणारे आहे. यातच पावसाचा अजून दोन महिन्यांहून जास्त काळ शिल्लक असल्याने सर्व तलाव लवकरच भरतील असेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांना वर्षभर पुरेसे पाणी मिळण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी सातही धरणांत मिळून 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. मात्र 2018 मध्ये तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडल्याने नोव्हेंबर 2018 पासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात करावी लागली होती. 2019 मध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर जुलै 2019 मध्ये पाणीकपात रद्द करण्यात आली होती. मात्र यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनपर्यंत तलावक्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे 547280 दशलक्ष लिटर पाणी कमी आहे.

27 जुलै रोजीचा पाणीसाठा

(दशलक्ष लिटरमध्ये)

तलाक –  पाणीसाठा

  • अप्पर वैतरणा 38743
  • मोडक सागर 48319
  • तानसा 35793
  • मध्य वैतरणा 62000
  • भातसा 250214
  • विहार 17195
  • तुळशी 7990
  • एकूण 460343
आपली प्रतिक्रिया द्या